शेळयांचे गट वाटप करणे

By Vikaspedia on 28 Oct 2017 | read
    014

राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे. या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.

योजनेचा तपशील (एक शेळीगट खर्चाचा तपशील)
अ . क़्रतपशीलखर्च
1.शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 बोकडरू.1,74,000/-
2.शेड बांधकाम व कुंपणरू.77,000/-
3.खादय व पाण्याची भांडीरू.6500/-
4.जंतनाशक व गोचिड प्रतिबंधक व खनितविटारू.2200/-
5.विमारू.8700/-
6.मुरघास बॅग/टाकीरू.10,000/-
7.कडबा कुटी यंत्ररू.17,500/-
8.वैरणीचे बियाणे पुरवठारू.2100/-
9.प्रशिक्षणरू.2000/-

एकूणरू.3,00,000/-
अनुदान 50%रू.1,50,000/-
लाभार्थी हिस्सा 50%रू.1,50,000/-
एकूण वाटप करावयाचे गट660 गट
प्रति गट खर्च (अनुदान)रू.1,50,000/-
एकूण खर्च (रू.1,50,000/-X 660 गट)रू.990.00 लाख
1% प्रशासकीय खर्चरू.9.90 लाख
एकूण खर्च

रू.999.90 लाख 
म्हणजेच रू.10.00 कोटी

 

 

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

 

Comments